Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

एनईएफटी व्यवहार




इंटरनेटद्वारे बँकिंग व्यवहार करणे हे आपल्याकडे आता काही नवीन बाब राहिलेली नाही. देशातील बहुराष्ट्रीय व खासगी क्षेत्रातील बँकांनी इंटरनेट बँकिंग आपल्यादेशात सर्वात पहिल्यांदा आणले. आता या स्पर्धेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उडी घेतली आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, या इंटरनेट बँकिंगव्दारे व्यवहार करताना ही सेवा देणाऱ्या बँकांनी सुरक्षिततेला महत्त्व दिले आहे. सुरुवातीला अनेकांना इंटरनेट बँकिंगच्या सुरक्षिततेबाबत शंका वाटत असता. परंतु ही पध्दती अत्यंत सुरक्षित आहे, असे सर्वात प्रथम नमूद करावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही अत्यंत सुरक्षित पध्दतीने घरबसल्या बँक खात्यातील आपले व्यवहार काय झाले आहेत ते तपासू शकतो. किंवा कोणतेही व्यवहार करु शकतो. त्याच्या जोडीला अनेक मूल्यवर्धीत सेवांचा लाभ आपल्याला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून घेता येतो. 
टी.डी.एस. चौकशी
गेल्या आर्थिक वर्षांत तुमच्या खात्यातून प्राप्ति कर किती कापण्यात आला हे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांत तुम्हाला किती कर द्यावयाचा आहे तसेच तुम्ही किती कर भरावयाचा आहे हे सर्व व्यवहार तुम्हाला इंटरनेट बँकिंगव्दारे पहाता येतील. तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम १०,००० रुपये झाली की, त्यावर टी.डी.एस. कापला जातो. तुमच्या खात्यातील टी.डी.एस.ची स्थिती तपासण्यासाठी केवळ ३० मिनिटे खर्च करावी लागतील. अशा प्रकारे तुम्हाला कर विषयक नियोजन घरी बसून करता येईल. बँक अधिकाऱ्याच्या सहीने दिलेले टी.डी.एस. प्रमाणपत्र प्राप्तिकर खात्यात सादर करता येईल. 
डिमांड ड्राफ्ट मिळविणे
इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या डिमांड ड्राफ्ट मिळणे अतिशय सोपे झाले आहे. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन डिमांड ड्राफ्टसाठी रक्कम कपात करण्याचा आदेश तुम्ही तुमच्या खात्यात दिला की, तुम्हाला ज्या खात्यात रक्कम पाठवायची असेल तेथे काही क्षणात पोहोचते. त्यानंतर ड्राफ्ट घरपोच पोहोचविणे किंवा त्याची डिलिव्हरी तुम्ही स्वत: बँकेतून जाऊन घेणे असे दोन पर्याय स्वीकारु शकता. अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १० हजार रुपयापर्यंतच्या ड्राफ्टवरील कमिशन माफ केले आहे. त्यानंतर एक लाख ते पाच लाख रुपयांवरील ड्राफ्टवर १०० रुपये कमिशन आकारले जाते. 
बँकअंतर्गत निधी हस्तांतरण
देशातील बँकांमध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने बँक अंतर्गत निधी हस्तांतरीत करण्यात येतो. यासाठी दोन प्रकारच्या पध्दती अस्तित्वात आहेत. यातील पहिल्या पध्दतीनुसार नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्फर नुसार निधी हस्तांतरीत केला जातो. यात रिझव्‍‌र्ह बँक ही सेवा पुरविते. त्यांच्या मार्फत हे पैसे हस्तांतरीत केले जातात. या सेवेव्दारे किमान कितीही व जास्तीत जास्त पाच लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत केला जाते. दुसऱ्या पध्दतीनुसार, एन.ई.एफ.टी. ही सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत उपलब्ध असते. यात आलेले पैसे रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठविले जातात आणि तेथून ती रक्कम संबंधीत खात्यात पाठविली जाते. 
बिल पेमेंट 
ही एक सर्वात मोठी सुविधा इंटरनेटव्दारे सेवेव्दारे उपलब्ध झाली आहे. या सेवेचा वापर करुन आपण वेळ, आपली उर्जा वाचवू शकतो. त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात बिल भरण्याचा आपण विलंब यात टाळू शकतो. दरमहा प्रत्येक बिलासाठी चेक लिहणे आपण यातून टाळू शकतो. बिल भरण्यासाठी असणाऱ्या लांब रांगेत उभे राहाण्याची आपल्याला गरज भासत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आपण अशा प्रकारे एका झटक्यात बिलाचा भरणा करु शकतो. यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन तेथे असलेल्या सूचनांनुसार क्लिक केल्यावर क्षणात तुमच्या खात्यातून पैसे वजा होऊन बिलाचा भरणा केला जातो. तुमचे बिल भरले गेल्यावर तुम्हाला एस.एम.एस. देखील येतो. टेलिफोन, विज, विमा, क्रेडिट कार्ड व अन्य बिले भरण्याची सोय या सेवेव्दारे उपलब्ध होते. वर्षांतले ३६५ दिवस व २४ तासात कधीही आपण या सेवेचा लाभ घेऊ शकतो. त्याचबरोबर या बिलांच्या रकमेवर जास्तीत जास्त निधीचा कॅप ठेऊन आपण बिल भरण्याची स्टँडिंग ऑर्डरही देऊ शकतो. इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करीत असताना काही सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.


माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन