Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

इंटरनेट जगतातला धोकायदायक पासवर्ड



नमस्कार मित्रांनो आपण सर्व इंटरनेट युजर आहात मग आपण एक लक्षात ठेवा इंटरनेट जगतातला सर्वात साधा आणि सोपा पासवर्ड आहे 123456 आणि या आधी २०१२ साली सर्वात लोकप्रिय पासवर्ड होता password. जगातील लाखो इंटरनेट युजर्स या पासवर्डचा वापर करत होते.

जर तुम्हीही असाच पासवर्ड वापरत असाल, तर तो त्वरीत बदलून टाकणे कधीही चांगले आहे. यामुळे तुमच्या बँक अकाऊंटपासून, इंटरनेट जगताशील सर्वच गोष्टी सुरक्षित राहणार आहे.

इंटरनेट सिक्योरिटी डेव्हलपर कंपनी स्प्लॅश डेटाने २०१३ च्या खराब पासवर्डची एक यादी तयार केली आहे. यावरून 123456 हा पासवर्ड सर्वात जास्त वेळेस, सर्वात जास्त युझर्सने वापरला आहे.

ही यादी चोरले गेलेले आणि पोस्ट केलेल्या पासवर्डच्या आधारावर बनवण्यात आलेली आहे. 123456 हा पास १३ कोटी युझर्सने २० लाख वेळेस वापरला आहे.

[अधिकवाचा ...]


विज बिल ऑनलाईन भरणा कसा करावा.



वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना आता रांगेत उभे राहण्याची झंझट उरणार नाही, किंवा कार्यालय बंद झाले म्हणून उद्यावर बिल भरणा ढकलता येणार नाही. कारण, आता वीज कंपनीतर्फे जिल्ह्यातील 11 बिलिंग युनिटच्या क्षेत्रातील लघुदाब वीज ग्राहकांसाठी इंटरनेटवरून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या किंवा सायबर कॅफेतून बिल भरता येईल.

वीज कंपनीतर्फे ग्राहकांना दरमहा बिल देण्यात येते. बिल प्राप्त झाल्यावर ग्राहकांना ते वीज कंपनीच्या विविध भरणा केंद्रात स्वतः जाऊन भरावे लागते. तेथे काही वेळेस गर्दी असल्यास रांगेत ताटकळावे लागते. ग्राहकांचा वेळ वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन आता वीज कंपनीतर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहक सेवेत सुधारणा करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व लघुदाब वीज ग्राहकांना बिले इंटरनेटवरून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व नेट बॅंकेने भरता येतील. महावितरण कंपनीने  बॅंकेच्या साहाय्याने स्वतःची पेमेंट गेटवे सुविधा सुरू केली आहे.
कसे भराल बिल
इंटरनेटच्या माध्यमातून वीजबिल भरण्यासाठी महावितरणाच्या http://billing.mahadiscom.in/ या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक आपले बिल पाहू शकतात. बिलावर उपलब्ध असलेला ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट क्रमांक टाकून इंटरनेटद्वारे बिल कसे भरावे याची कार्यपद्धती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा आतापर्यंत अनेक ग्राहकांनी लाभ घेतला आहे. याशिवाय या सुविधेच्या संदर्भात अधिक माहिती व तक्रारीसाठी महावितरण कंपनीने मुंबईतील प्रकाशगड मुख्य कार्यालयात एक विशेष सहाय्यता केंद्र सुरू केले आहे. या ग्राहक केंद्राशी helpdesk-pg@mahadiscom.in या इ-मेलवर संपर्क करू शकतात. जिल्ह्यातील ग्राहकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. परदेशी यांनी केले आहे.
[अधिकवाचा ...]


मोबाइल बँकिंगनंतर आता टॅब्लेट बँकिंग



इंटरनेट बँकिंग, मोबाइल बँकिंगच्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असतानाच आता बँकिंग जगताने नव्याने होऊ घातलेली टॅब्लेट क्रांती कॅश करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी ‘टॅब बँकिंग’ ही नवी सेवा सुरू करून खासगी क्षेत्रात अग्रणी असलेल्या बँकांनी पहिले पाऊल टाकले आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना आता खाते उघडण्यासाठी बँकांच्या शाखेत हेलपाटे न मारता घरच्या घरी किंवा कार्यालयातच ते उघडता येऊ शकेल. केवळ इतकेच नाही, तर आणखी चार नवीन सेवा बँकांनी उपलब्ध करून दिल्या आहेत.
ग्राहकांना अखंडित व आनंदपूर्ण अनुभव देण्यासाठी 5 एमपी कॅमेरा व जलद प्रोसेसर असलेला हाय-एंड कस्टमाइज्ड टॅब्लेट ही या उत्पादनाची वैशिष्ट्ये आहेत.बँक अधिकारी या टॅब्लेटमार्फत  अर्ज भरण्यासाठी ग्राहकांना मदत करतात. यामध्ये बिल्ट-इन तपासणीची सोय आहे, ज्यामुळे अर्जातील सर्व तपशील बरोबर असल्याची आणि आवश्यक ती सर्व माहिती   बरोबर घेतल्याची खात्री मिळते.
ग्राहकाचा फोटो घेण्यासाठी आणि त्याची केवायसी कागदपत्रे स्कॅन करण्यासाठी उपयोग. त्यामुळे प्रत्यक्ष दस्तऐवज सादर करण्याची गरज नाही. माहिती पूर्ण भरून झाली की, ती तातडीने बॅक-एंड यंत्रणेत अपलोड केली जाते आणि यामुळे बँक खाते उघडण्याची प्रक्रिया झटपट होण्यास मदत होते. बँकेच्या अधिका-यांना आमच्या इंटरनेट बँकिंग आणि मोबाइल बँकिंग माध्यमांविषयी व अन्य उत्पादनांविषयी ऑडिओ व्हिज्युअल प्रात्यक्षिक दाखवता येईल.
ग्राहकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी टॅब्लेटमध्ये विविध साधने व कॅल्क्युलेटर इन-बिल्ट आहेत. उदा. ज्या प्रकारे मासिक सरासरी बाकी मोजली जाते किंवा मुदत ठेवीचे व्याजदर कालावधीशी जोडले जातात वा ग्राहकांना ब्रँच लोकेटरविषयी सांगितले जाते.
24 बाय 7 इलेक्ट्रॉनिक शाखा
 बँकेने 24 * 7 इलेक्ट्रॉनिक शाखा दाखल केल्या आहेत, ज्या सर्व बँकिंग व्यवहारांसाठी वन-स्टॉप शॉप आहेत. ग्राहकांना त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार, विविध ऑटोमेटेड उपकरणांच्या व किऑस्कच्या मदतीने स्वत:चे स्वत: व्यवहार करता येतील.
इलेक्ट्रॉनिक शाखा चेक डिपॉझिट मशीन, डेबिट कार्ड स्वाइप करून इंटरनेट बँकिंग सेवा वापरता येईल असे संवादात्मक किऑस्क, तातडीने पैसे जमा करणारे कॅश डिपॉझिट मशीन आणि आयसीआयसीआय बँकेच्या कस्टमर केअर कर्मचाºयासोबत चोवीस तास व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अशा सुविधा देतात. सध्या 18 ठिकाणी 25 इलेक्ट्रॉनिक शाखा आहेत.
ग्राहकांचा फायदा असा :
ग्राहकांना घरात बसून खाते उघडता येईल. फोटो काढण्यासाठी वा केवायसी कागदांच्या प्रती काढण्यासाठीही घराबाहेर जावे लागणार नाही. खाते उघडण्याची प्रक्रिया विनासायास असेल. ग्राहकांना प्रात्यक्षिक पाहता येईल. इंटरनेट व मोबाइल बँकिंग माध्यमांविषयी माहिती करून घेता येईल तसेच सर्व उत्पादने पाहून त्यातून योग्य त्या उत्पादनाची निवड करता येऊ शकेल. ज्या सर्व गोष्टी वेळ व ठिकाणाच्या सोयीनुसार करता येतील
[अधिकवाचा ...]


एनईएफटी व्यवहार




इंटरनेटद्वारे बँकिंग व्यवहार करणे हे आपल्याकडे आता काही नवीन बाब राहिलेली नाही. देशातील बहुराष्ट्रीय व खासगी क्षेत्रातील बँकांनी इंटरनेट बँकिंग आपल्यादेशात सर्वात पहिल्यांदा आणले. आता या स्पर्धेत सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी उडी घेतली आहे. एक बाब लक्षात घेतली पाहिजे की, या इंटरनेट बँकिंगव्दारे व्यवहार करताना ही सेवा देणाऱ्या बँकांनी सुरक्षिततेला महत्त्व दिले आहे. सुरुवातीला अनेकांना इंटरनेट बँकिंगच्या सुरक्षिततेबाबत शंका वाटत असता. परंतु ही पध्दती अत्यंत सुरक्षित आहे, असे सर्वात प्रथम नमूद करावेसे वाटते. अशा प्रकारे तुम्ही अत्यंत सुरक्षित पध्दतीने घरबसल्या बँक खात्यातील आपले व्यवहार काय झाले आहेत ते तपासू शकतो. किंवा कोणतेही व्यवहार करु शकतो. त्याच्या जोडीला अनेक मूल्यवर्धीत सेवांचा लाभ आपल्याला इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून घेता येतो. 
टी.डी.एस. चौकशी
गेल्या आर्थिक वर्षांत तुमच्या खात्यातून प्राप्ति कर किती कापण्यात आला हे तुम्ही पाहू शकता. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांत तुम्हाला किती कर द्यावयाचा आहे तसेच तुम्ही किती कर भरावयाचा आहे हे सर्व व्यवहार तुम्हाला इंटरनेट बँकिंगव्दारे पहाता येतील. तुमच्या खात्यात व्याजाची रक्कम १०,००० रुपये झाली की, त्यावर टी.डी.एस. कापला जातो. तुमच्या खात्यातील टी.डी.एस.ची स्थिती तपासण्यासाठी केवळ ३० मिनिटे खर्च करावी लागतील. अशा प्रकारे तुम्हाला कर विषयक नियोजन घरी बसून करता येईल. बँक अधिकाऱ्याच्या सहीने दिलेले टी.डी.एस. प्रमाणपत्र प्राप्तिकर खात्यात सादर करता येईल. 
डिमांड ड्राफ्ट मिळविणे
इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्हाला घर बसल्या डिमांड ड्राफ्ट मिळणे अतिशय सोपे झाले आहे. बँकेच्या वेबसाईटवर जाऊन डिमांड ड्राफ्टसाठी रक्कम कपात करण्याचा आदेश तुम्ही तुमच्या खात्यात दिला की, तुम्हाला ज्या खात्यात रक्कम पाठवायची असेल तेथे काही क्षणात पोहोचते. त्यानंतर ड्राफ्ट घरपोच पोहोचविणे किंवा त्याची डिलिव्हरी तुम्ही स्वत: बँकेतून जाऊन घेणे असे दोन पर्याय स्वीकारु शकता. अनेक सार्वजनिक क्षेत्रातील बँकांनी १० हजार रुपयापर्यंतच्या ड्राफ्टवरील कमिशन माफ केले आहे. त्यानंतर एक लाख ते पाच लाख रुपयांवरील ड्राफ्टवर १०० रुपये कमिशन आकारले जाते. 
बँकअंतर्गत निधी हस्तांतरण
देशातील बँकांमध्ये इलेक्ट्रॉनिक पध्दतीने बँक अंतर्गत निधी हस्तांतरीत करण्यात येतो. यासाठी दोन प्रकारच्या पध्दती अस्तित्वात आहेत. यातील पहिल्या पध्दतीनुसार नॅशनल इलेक्ट्रॉनिक्स फंड ट्रान्फर नुसार निधी हस्तांतरीत केला जातो. यात रिझव्‍‌र्ह बँक ही सेवा पुरविते. त्यांच्या मार्फत हे पैसे हस्तांतरीत केले जातात. या सेवेव्दारे किमान कितीही व जास्तीत जास्त पाच लाख रुपयांची रक्कम हस्तांतरीत केला जाते. दुसऱ्या पध्दतीनुसार, एन.ई.एफ.टी. ही सेवा सोमवार ते शुक्रवार सकाळी ८ ते ११.३० वाजेपर्यंत उपलब्ध असते. यात आलेले पैसे रिझव्‍‌र्ह बँकेकडे पाठविले जातात आणि तेथून ती रक्कम संबंधीत खात्यात पाठविली जाते. 
बिल पेमेंट 
ही एक सर्वात मोठी सुविधा इंटरनेटव्दारे सेवेव्दारे उपलब्ध झाली आहे. या सेवेचा वापर करुन आपण वेळ, आपली उर्जा वाचवू शकतो. त्याहून सर्वात महत्त्वाचे म्हणजे यात बिल भरण्याचा आपण विलंब यात टाळू शकतो. दरमहा प्रत्येक बिलासाठी चेक लिहणे आपण यातून टाळू शकतो. बिल भरण्यासाठी असणाऱ्या लांब रांगेत उभे राहाण्याची आपल्याला गरज भासत नाही. इंटरनेटच्या माध्यमातून आपण अशा प्रकारे एका झटक्यात बिलाचा भरणा करु शकतो. यासाठी तुम्हाला बँकेच्या वेबसाईटला भेट देऊन तेथे असलेल्या सूचनांनुसार क्लिक केल्यावर क्षणात तुमच्या खात्यातून पैसे वजा होऊन बिलाचा भरणा केला जातो. तुमचे बिल भरले गेल्यावर तुम्हाला एस.एम.एस. देखील येतो. टेलिफोन, विज, विमा, क्रेडिट कार्ड व अन्य बिले भरण्याची सोय या सेवेव्दारे उपलब्ध होते. वर्षांतले ३६५ दिवस व २४ तासात कधीही आपण या सेवेचा लाभ घेऊ शकतो. त्याचबरोबर या बिलांच्या रकमेवर जास्तीत जास्त निधीचा कॅप ठेऊन आपण बिल भरण्याची स्टँडिंग ऑर्डरही देऊ शकतो. इंटरनेट बँकिंगचे व्यवहार करीत असताना काही सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे असते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचा पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.
[अधिकवाचा ...]


बँकेत नविन खाते कसे उघडावे




फायदे
आपली कमाई सुरक्षित ठेवणे,
बचत केलेल्या रकमेवर व्याज प्राप्त करण्यासाठी,
तिस-या  पक्षाकडून पैसा जमा करुन घेण्यासाठी (चेक, बँक ड्राफ्ट, रोख किंवा ऑनलाईन)
यूटिलिटी बिलाचा भरणा करण्यासाठी (उदा. एलआयसी प्रीमियम, ट्रेनचे तिकीट बुकींग)
बँकेत खाते उघडण्यासाठी काय गरजेचे आहे
भरलेला अर्ज (हा संबंधित बँकेच्या शाखेतून घेता येतो)
दोन पासपोर्ट आकाराचे रंगीत फोटो.
ओळखपत्राची झेरॉक्स कॉपी
राहत्या पत्त्याची झेरॉक्स कॉपी
रोख रु. १००० (ही रक्कम प्रत्येक बँकेनुसार बदलते)
एक गॅरंटर (ज्याचे त्या आगोदर बँकेत खाते आहे) जो आपल्या अर्जावर सही करेल
सूचना: ओळकखपत्र आणि राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी दोन वेगवेगळे कागद प्रस्तूत केले जावेत.
ओळखपत्र म्हणून दिल्या जाणा-या प्रमाणासाठी खालीलपैकी कोणतीही वस्तू वापरता येते :
पासपोर्ट (पत्ता वेगळा असतो अशा वेळी),
मतदान ओळखपत्र,
पॅनकार्ड,
सरकारी/ सैनिक ओळखपत्र,
एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र,
वाहन परवाना
पोस्ट ऑफिसने जारी केलेले फोटो आयडी कार्ड
राहत्या पत्त्याच्या प्रमाणासाठी खालील पैकी कोणताही कागद लावता येतो :
क्रेडिट कार्ड स्टेटमेंट
पगार-पावती (पत्त्यासकट)
आयकर/ संपत्ति कर निर्धारण आदेश
वीज बिल
दूरध्वनी बिल
बँक खाते स्टेटमेंट
एखाद्या मान्यताप्राप्त कंपनीचे ओळखपत्र
कोणत्याही मान्यताप्राप्त सार्वजनिक प्राधिकरणाकडून पत्र
रेशन कार्ड
एलपी गॅस बिल
एकदा खाते उघडल्यावर, आपल्याला खालील कागदपत्र मिळतील :
आपल्या नावाचे फोटो असलेले पासबुक
एटीएम आणि डेबिट कार्ड (ह्यासाठी कमीतकमी दोन आठवडे लागतात)
चेक बुक (ह्यासाठीदेखील दोन आठवडे कमीतकमी लागतात)

[अधिकवाचा ...]


माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन