Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

ऑनलाईन बँकिंग म्हणजे काय?



 अनेक बँकांमध्ये इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी अर्जाची व्यवस्था असते. काही बँका तुम्हाला परस्पर ऑनलाईन बँकिग सुरु करण्याची परवानगी देतात. मात्र जो पर्यंत तुम्ही स्वत: बँकेच्या एखाद्या शाखेवर जाऊन तुमच्या ओळखीची पडताळणी करत नाही तो पर्यंत बँक कोणतेही देवाण घेवाणीचे व्यवहार करत नाही. तुम्हाला तुमचं ओळखपत्र आणि बँकेचे काही कागदपत्र सोबत घेऊन जावे लागतात. तुम्ही अजून बँक खाते उघडले नसेल तर ते उघडताना तुम्ही इंटरनेट बँकिंग विषयी विचारू शकता.
अनेक बँका एकाच फी आकारणीमध्ये इंटरनेट बँकिंग, टेलिफोन, मोबाईल अशा सर्व सुविधा देतात. याचाच अर्थ असा की जेव्हा तुम्ही इंटरनेट बँकिंगची सेवा घेता तेंव्हा खास पासवर्डच्या माध्यमातून तुमच्या खात्यावरची बाकी रक्कम मोबाईलवर बघू शकता. शिवाय तुमची बिलंही फेडू शकता. या प्रकारे तुमच्याकडे इंटरनेट सेवा नसली तरी तुम्ही बँक किंवा एटीएम मध्ये न जाताही बँकेचे व्यवहार करू शकता.
थोडक्यात इंटरनेट बँकिंग सुरु करण्यासाठी तुमचे ज्या बँकेत खाते असेल त्या बँकेचे सर्व पुरावे ,कागद पत्र घेऊन जावे.तेथील बँक अधिकारी यांना इंटरनेट बँक व्यवहार विषयी चर्चा करून ते फॉर्म भरून घेतील त्या नंतर १० ते १५ दिवसांनी तुम्हाला पोस्टाद्वारे बँक खात्याचा आय डी ,पासवर्ड व रक्कम ट्रान्सफर करण्यासाठी कोड इ.माहिती पाठवली जाते.आलेले कोड व पासवर्ड ने तुम्ही तुमच्या बँक खात्यात प्रवेश केल्यानंतर तुम्ही स्व:ता पासवर्ड बदलून घ्यावा.
इंटरनेट बँकिंगला काय खर्च येतो.
ब-याच बँका त्यांच्या इंटरनेट आणि टेलिफोन सेवेसाठी ठराविक मासिक रक्कम आकारतात. बँकेच्या इतर व्यवहारांसाठीही तुमच्याकडून पैसे घेतले जातात जरी ते एटीएम आणि बँकेच्या मानाने कमी असतात. पैशांच्या दळणवळणावर होणारा खर्च एटीएममुळे कमी होतो. वेळेत बिल भरल्यामुळे तुम्ही तुमचा वेळ आणि विलंबाची फी जी तुम्ही याआधी वेळेअभावी देत होता ती वाचवू शकता.
इतर बँका त्यांच्या सेवेसाठी किती पैसे आकारतात ते पहा. त्यांची इंटरनेट फी कमी असेल तर यांचे इतर आकारणीही कमी आहे का ते पहा. जर तशा सोयी असतील तर या नव्या बँकेत तुम्ही खाते उघडू शकता.
तुम्ही बँकेकडून आठवडयातून एकदा किंवा त्याहीपेक्षा कमी वेळा स्टेटमेंट मागून आकारणी आणखी कमी करू शकता. यामुळे तुमच्या खात्यात तुमची बिलं भरण्यासाठी पुरेसे पैसे आहेत हे तुम्हाला कळेल. मात्र ही बिलं अधिक असतील तर तुम्हाला बँकेलाही अधिक पैसे द्यावे लागतील.


माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन