Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

बँक आर टी जी एस सुविधा म्हणजे काय?



कोअर बँकिंगच्या पुढील प्रणाली म्हणजे आर टी जी एस याचा अर्थ Real Time Gross Settlement! अर्थात RTGS यंत्रणेद्वारे पैसे ट्रान्सफर करणे हे फक्त त्याच बँकांच्या शाखांच्या बाबतीत शक्य आहे की ज्या शाखा कोअर बँकिंग अंतर्गत जोडलेल्या आहेत.बॅँकेतील रक्कम हस्तांतर करण्यासाठी उपलब्ध असलेल्या ‘आरटीजीएस’ आणि ‘एनईएफटी’ सारख्या अत्याधुनिक सुविधा सध्या केवळ खासगी, राष्ट्रीयीकृत बॅँका यांच्यासह सदस्य बॅँकांनाच वापरता येऊ शकत होत्या; परंतु आता या सुविधा ग्रामीण विभागीय बँका आणि सहकारी बँकांना देखील उपलब्ध होत  असल्यामुळे सगळ्याच बँक ग्राहकांचे निधी हस्तांतराचे काम अतिशय सुलभ होत  आहे. आर टी जी एस द्वारे  काही मिनिटात पैसे कुठूनही कुठेही जमा करण्याची सोय आहे. 
इलेक्ट्रॉनिक माध्यमातून रक्कम सुविधा आणखी लोकप्रिय करण्याच्या उद्देशाने रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने आता विभागीय ग्रामीण बँका तसेच सहकारी बॅँकांना मध्यवर्ती ‘पेमेंट सिस्टिम्स’ समाविष्ट करून घेण्याची परवानगी दिली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता सर्वच बँकांना ‘आरटीजीएस’ आणि ‘एनइएफटी’ या प्रणालीच्या मदतीने  इलेक्ट्रॉनिक स्वरूपात रक्कम हस्तांतर करता येऊ शकणार आहे.
अपवाद म्हणून ग्रामीण विभागीय बँकांनाही त्यांच्या प्रायोजित बँकांच्या मदतीने ‘एनईएफटी’ प्रणालीचा उपयोग करता येऊ शकणार आहे. त्याचबरोबर सर्व परवानाधारक बॅँकांना एनइएफटी आणि आरटीजीएस प्रणालीत सहभागी करून घेण्यासाठी उप सदस्यत्व देऊन या सुविधांचा आणखी विस्तार करण्याचा शिखर बॅँकेचा विचार आहे.
ग्राहकांचा फायदा असा - आरटीजीएस व्यवहार शुल्क हे ग्राहकाबरोबर असलेल्या बँकेच्या नातेसंबंधावर अवलंबून असते. हे शुल्क प्रति व्यवहार 50 रुपयांपासून ते 200 रुपयांपर्यंत असू शकते. आरटीजीएस प्रणाली पूर्णपणे कार्यान्वित झाल्यानंतर तुमच्या खात्यातील रक्कम शून्य दिवसात किंवा डिमांड ड्राफ्ट बँकेला सादर केल्यानंतर त्याच दिवशी तुमच्या खात्यात जातो. सध्या या प्रक्रियेला किमान तीन दिवस लागतात. विशेष म्हणजे डिमांड ड्राफ्ट प्रत्यक्ष हाताळण्याची जोखीमही यामुळे टळते. एनईएफटी प्रणालीमध्ये ग्राहक एखाद्या बँकेच्या शाखेत जाऊन त्याला ज्या व्यक्तीच्या खात्यात रक्कम हस्तांतरित करायची आहे, त्या खात्यात रोख रक्कम पाठवू शकतो. विशेष म्हणजे रक्कम पाठवणारी आणि रक्कम स्वीकारणारी व्यक्ती यांचे त्या बँकेत खाते असण्याची गरज नाही. त्यासाठी या प्रणालीमध्ये व्यवहारासाठी सांकेतिक क्रमांक दिला जातो. परंतु, यासाठी बँकेत येणाºया ग्राहकासाठी 50 हजार रुपयांची मर्यादा आहे.
आरटीजीएस म्हणजे काय ?
-आरटीजीएस (रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट) ही अशी प्रणाली आहे, ज्यामध्ये एका बँकेतून दुसºया बँकेत विनाविलंब रक्कम हस्तांतर करता येऊ शकते. याद्वारे 2 लाख रुपये हस्तांतरित करता येऊ शकतात. 
-एनईएफटी (नॅशनल इलेक्ट्रॉनिक फंड ट्रान्सफर) च्या माध्यमातून देशातील कोणत्याही बँकेत पैसे हस्तांतर करता येतात. एका वेळी 50,000 रुपये हस्तांतरित होतात.
विशेष म्हणजे तुम्ही जर नेटबँकिंग करत असाल तर बँकेत न जाता आपण आपल्या घरच्या संगणकाद्वारे RTGS ऑपशन मध्ये जाऊन ज्या व्यक्तीला तुम्हाला रक्कम द्यावयाची आहे ,त्या व्यक्तीचा खाते क्रमांक द्यावा, काही बँका IFS Code विचारणा करतात.तेव्हा हा कोड संबंधित बँकेकडून घ्यावा. किंवा  भारतीय रिझर्व्ह           बँकेच्या http://www.rbi.org.in या संकेतस्थळावर आपणास संबधित बँकेचा IFS Code मिळेल. आर्थात असे व्यवहार करतांना तुम्ही बँक अधिकारी यांच्याशी चर्चा करणे आवश्य आहे. 


माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन