Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

मोबाइल बँकिंग म्हणजे काय?



बँकांतील व्यवहार ग्राहकांना मोबाइलच्या माध्यमातून करता येणाऱ्या सुविधेला मोबाइल बँकिंग किंवा एसएमएस बँकिंग म्हणतात. कारण या सुविधेमध्ये थेट कॉल न करता एसएमएसच्या सहाय्याने व्यवहार केले जातात. साधारणपणे बँका या सुविधेसाठी पैसे घेत नाहीत, एसएमएसचा खर्च मात्र पडतो. यामध्ये तुम्ही केलेला व्यवहार एसएमएसच्या माध्यमातून काही क्षणात ग्राहकाच्या मोबाइल स्क्रीनवर वाचता येतो. मोबाइल कंपन्यांच्या सहकार्यातून वेगवेगळ्या बँका ही सुविधा देतात, त्यामुळे बँकेचा ज्या कंपनीशी करार आहे, त्या मोबाइल कंपनीच्या माध्यमातूनच व्यवहार करता येतो. या माध्यमातून व्यवहारासाठी साधारणपणे बँकेत बचत, चालू वा फिक्स्ड डिपॉझिट प्रकारचे खाते असायला लागते. 
ही सेवा देणाऱ्या बहुतेक बँका पुढील सेवा देतात : 
* कस्टमर आयडेंटिफिकेशनशी संलग्न खात्यांचा बॅलन्स कळतो. 
* मुख्य खात्यात केलेले शेवटचे तीन व्यवहार कळतात. 
* एकावेळी एका चेकचे स्टॉप पेमेंट करता येते. 
* चेकबूकची मागणी नोंदवता येते. 
* अकाउंट स्टेटमेंट मागवता येते. 
* चेकच्या सद्यस्थितीची चौकशी करता येते. 
* बिल पेमेंट करता येते. 
* फिक्स्ड डिपॉजिटची चौकशी करता येते. 
* मोबाइल नंबर बदलल्यास तसा बदल करता येतो. 
* नॅशनल रोमिंग असल्यास देशभरातून ही सुविधा घेता येते.


माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन