Pulpit rock
सूचना:तुमचा बँक पासवर्ड गुप्त ठेवणे आवश्यक आहे. तसेच सतत पासवर्ड बदलत राहा.

विज बिल ऑनलाईन भरणा कसा करावा.



वीज बिल भरण्यासाठी ग्राहकांना आता रांगेत उभे राहण्याची झंझट उरणार नाही, किंवा कार्यालय बंद झाले म्हणून उद्यावर बिल भरणा ढकलता येणार नाही. कारण, आता वीज कंपनीतर्फे जिल्ह्यातील 11 बिलिंग युनिटच्या क्षेत्रातील लघुदाब वीज ग्राहकांसाठी इंटरनेटवरून बिल भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांना घरबसल्या किंवा सायबर कॅफेतून बिल भरता येईल.

वीज कंपनीतर्फे ग्राहकांना दरमहा बिल देण्यात येते. बिल प्राप्त झाल्यावर ग्राहकांना ते वीज कंपनीच्या विविध भरणा केंद्रात स्वतः जाऊन भरावे लागते. तेथे काही वेळेस गर्दी असल्यास रांगेत ताटकळावे लागते. ग्राहकांचा वेळ वाया जातो. ही बाब लक्षात घेऊन आता वीज कंपनीतर्फे माहिती तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ग्राहक सेवेत सुधारणा करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सर्व लघुदाब वीज ग्राहकांना बिले इंटरनेटवरून क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड व नेट बॅंकेने भरता येतील. महावितरण कंपनीने  बॅंकेच्या साहाय्याने स्वतःची पेमेंट गेटवे सुविधा सुरू केली आहे.
कसे भराल बिल
इंटरनेटच्या माध्यमातून वीजबिल भरण्यासाठी महावितरणाच्या http://billing.mahadiscom.in/ या संकेतस्थळावर जाऊन ग्राहक आपले बिल पाहू शकतात. बिलावर उपलब्ध असलेला ग्राहक क्रमांक व बिलिंग युनिट क्रमांक टाकून इंटरनेटद्वारे बिल कसे भरावे याची कार्यपद्धती संकेतस्थळावर उपलब्ध करून दिली आहे. या योजनेचा आतापर्यंत अनेक ग्राहकांनी लाभ घेतला आहे. याशिवाय या सुविधेच्या संदर्भात अधिक माहिती व तक्रारीसाठी महावितरण कंपनीने मुंबईतील प्रकाशगड मुख्य कार्यालयात एक विशेष सहाय्यता केंद्र सुरू केले आहे. या ग्राहक केंद्राशी helpdesk-pg@mahadiscom.in या इ-मेलवर संपर्क करू शकतात. जिल्ह्यातील ग्राहकांनी सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. परदेशी यांनी केले आहे.


माझ्याबद्दल

मी दत्तात्रय आवारे सामान्य नागरिकांसाठी ई-बॅंकिंग सेवा सुरू होऊन 10 ते 12 वर्षे होऊन गेली असून, त्यात मिळणाऱ्या सुविधांमध्ये वाढच होत गेली आहे.

अधिकवाचा

महत्वाच्या लिंक

जाहिरातीसाठी संपर्क:७५८८०९७०६२
या पानाच्या वरील भागावर जा कॉपीराईट © २०११ | सर्व प्रकारचे अधिकार सुरक्षित आहे.ब्लॉग डिजाईन ऑलवेब डिझाईन